ग्रामपंचायत माडगी अंतर्गत कार्यरत असलेल्या कल्पवृक्ष वाचनालय यांच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता व लेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने “निबंध स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार असून ज्ञानवृद्धी व वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे. गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन कल्पवृक्ष वाचनालय तसेच ग्रामपंचायत माडगी यांच्या वतीने करण्यात येत आहे. ग्रामपंचायत माडगी सदैव शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देत असून अशा उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.