शाळेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी नियमितपणे कबड्डीचा सराव घेण्यात येत आहे. या सरावादरम्यान विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत असून त्यांच्यात शिस्त, संघभावना, चपळता, ताकद व आत्मविश्वास वाढत आहे. कबड्डी सारख्या देशी खेळांमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासोबतच मानसिक संतुलन व खेळाडूवृत्ती विकसित होत आहे. शाळा तसेच ग्रामपंचायत माडगी यांच्या सहकार्याने खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून ग्रामीण क्रीडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.