शाळेमध्ये परसबाग तयार करण्यात आलेली असून तिचा नियमितपणे उपयोग केला जातो. या परसबागेत विविध भाजीपाला व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. परसबागेच्या देखभालीत विद्यार्थी सक्रिय सहभाग घेत असून त्यांना सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकविले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना, श्रमप्रतिष्ठा व निसर्गप्रेम वाढीस लागले आहे. शाळा व ग्रामपंचायत माडगी यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा हा उपक्रम शैक्षणिक व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.