माडगी गावातील शाळेने मुख्यमंत्री “माझी शाळा – सुंदर शाळा” या महत्त्वाकांक्षी अभियाना मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या अभियानाचा उद्देश शाळेचा भौतिक व शैक्षणिक परिसर स्वच्छ, सुरक्षित, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनवणे हा आहे. अभियानांतर्गत शाळा परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची रंगरंगोटी, शैक्षणिक भिंतलेखन, वृक्षारोपण तसेच पायाभूत सुविधांची सुधारणा यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या अभियानामुळे शाळेचे वातावरण अधिक सुंदर, आनंददायी आणि शिक्षणास पोषक झाले असून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल अभिमान, स्वच्छतेची सवय आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. “माझी शाळा – सुंदर शाळा” या अभियानातील सहभागातून शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आदर्श शालेय वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.