महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPHAY) ही गरीब, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. उच्च दर्जाच्या उपचारासाठी लागणारा आर्थिक बोजा कमी करून, कोणताही व्यक्ती पैशांच्या अभावामुळे उपचारापासून वंचित राहू नये हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.